Chopda : सख्खा भाऊ झाला पक्का वैरी ! डोक्यात दगड घालून लहान भावाची निर्घृण हत्या, मोठ्या भावाला अटक..

मार्च 22, 2026 6:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा तालुक्यातील नारोद येथून खळबळजनक घटना उघडकीस आली असून, मोठ्या भावानेच आपल्या सख्ख्या लहान भावाचा खून केला आहे. घरगुती वादातून संतप्त होऊन आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. रोहन पानचंद पाटील (वय २७) असे मयत तरुणाचे नाव असून, किरण पानचंद पाटील (मोठा भाऊ) संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

murder raver

२१ मार्च रोजी दुपारी नारोद येथील गुळी नदीच्या पात्रात रोहनचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्याने खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तपासादरम्यान धक्कादायक खुलासा झाला. किरणच्या चेहऱ्यावर ओरखडे आणि जखमा दिसून आल्याने पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

२० मार्चच्या रात्री किरणने रोहनला दारूसाठी पैसे दिले आणि गुळी नदीच्या पुलावर नेले. तेथे त्याला खाली ढकलून, जखमी अवस्थेत असताना डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. घरातील सततच्या वादांना आणि रोहनच्या नशेखोरीला कंटाळून हे कृत्य केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. या घटनेमुळे नारोद परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now