---Advertisement---
जळगाव शहर महाराष्ट्र

ब्रेकींग न्यूज : एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक

eknath khadse
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ जुलै २०२१ । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. भोसरी भूखंड प्रकरणी अटक झाल्याचे समजते.

eknath khadse

एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना भोसरी औद्योगीक वसाहतीमधील एक भूखंड हा नियमांचे उल्लंघन करून त्यांची पत्नी आणि जावई यांनी खरेदी केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणी खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या भूखंडाच्या चौकशीसाठी झोटींग समिती देखील नेमण्यात आली होती. तथापि, या समितीचा अहवाल हा मात्र अद्यापही विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नव्हता.

---Advertisement---

गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे यांनी सातत्याने भाजप नेत्यांवर व विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे ते चर्चेत होते. त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ असे आव्हानही दिले होते. या पार्श्‍वभूमिवर मध्यंतरी खडसे यांची ईडीने चौकशी देखील केली होती. यानंतर काल रात्रभर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---