खडसेंची सुरेल टोलेबाजी : सोमय्यांसाठी ये दोस्ती नहीं तोडेंगे तर फडणवीसांना दुश्मन न करे…

एप्रिल 10, 2022 11:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । एका वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे जुने सहकारी आणि दोस्त एकत्र आले. त्यानंतर मात्र चांगलीच सुरेल टोलेबाजी रंगली. किरीट सोमय्यांसाठी खडसेंनी ‘ये दोस्ती नहीं तोडेंगे’ हे शब्द वापरले तर फडणवीसांचा फोटो दाखविताच दुश्मन न करे ऐसा काम किया रे… हे शब्द खडसेंनी वापरल्याने एकच हशा पिकला.

eknath khadse kirit sommaya jpg webp

या कार्यक्रमात एकनाथराव खडसे आणि किरीट सोमय्या या दोघांच्या दोस्तीबद्दल सांगताना खडसे व सोमय्या एकत्र, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे गाणं गाताना दिसून आले. तसेच खडसेंनी किरीट सोमय्या यांना सल्ले देखील दिले. मी सोमय्यांना नेहमी जपून राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देत असतो, असे यावेळी खडसे म्हणाले. मला त्यांना सल्ला देण्याचा अधिकार आहे. ते कधी जात्यात असतात तर कधी सुपात असता, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी, असे खडसे म्हणाले. तसेच आमची दोस्ती ही पस्तीस वर्षांची आहे, असेही खडसेंनी आवर्जून सांगितले. दीड वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदाच व्यासपीठावर भेटलो, असेही त्यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांबाबत मात्र खडसेंचा सूर नेहमीप्रमाणे काहीसा विरोधातच पहावयास मिळाला. देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवल्यावर खडसेंनी चक्क.. दुश्मन न करे तुने ऐसा काम किया रे, दोस्त ने जिंदगीभर के लिये बदनाम किया रे, असे म्हणताच हशा पिकला. तर सोमय्यांनी फडणवीसांवर गाणं म्हणायलाच नकार दिला. त्यानंतर खडसेंना संजय राऊतांचा फोटो दाखवण्यात आला. त्यावेळी आ देखे जरा किसमे कितना है दम…हे गाणं गाताना दिसून आले. तर संजय राऊतांचा फोटो पाहताच सोमय्या म्हणाले मी साफ सफाईला सुरूवात केली आहे. यावेळी खडसेंनी जे ग्राऊंड लेव्हला काम केलं त्याला सोमय्या हे सलाम करताना दिसून आले. तसेच भाजपच्या मोठे होण्यात खडसेंचा मोठा वाटा आहे, असेही सोमय्या म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now