ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड बिनविरोध

जुलै 15, 2026 3:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२६ । सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी)च्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे अनेक दिवसांपासून सभासदांचे लक्ष लागले होते. अखेर आज झालेल्या निवड प्रक्रियेत रागिणी चव्हाण यांची अध्यक्षपदी, तर अनिल गायकवाड यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

Ragini chavan

माजी अध्यक्ष अजबसिंग पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर कोणाची निवड होणार, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया निश्चित करण्यात आली.

या निवडीत सहकार गट आणि लोकसहकार गटाने एकत्रित भूमिका घेत अध्यक्षपदासाठी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदासाठी अनिल गायकवाड यांच्या नावावर एकमत केले. त्यामुळे दोन्ही पदांसाठी त्यांची उमेदवारी निश्चित झाली.

निवड प्रक्रियेपूर्वी बाहेरगावी गेलेले सर्व संचालक उपस्थित झाल्यानंतर बैठक सुरू झाली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रागिणी चव्हाण यांची अध्यक्ष आणि अनिल गायकवाड यांची उपाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर उपस्थितांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांचे स्वागत केले.

निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवनिर्वाचित अध्यक्षा रागिणी चव्हाण यांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पारदर्शक आणि सभासदहिताचे धोरण राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांनीही सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत पतपेढीच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories