जागावाटपात पक्षाची ताकद नाही तर.. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

सप्टेंबर 30, 2025 4:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे वाहू लागले आहे. दिवाळीनंतर राज्यात निवडणुका लागण्याचे संकेत मिळाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलंय असून निवडणुकीसाठी महायुती युतीमध्ये संघर्ष सुरू आहे. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील जागावाटपाबाबत अनेक वृत्ते समोर येत आहेत. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवाराबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. जागावाटपात पक्षाची ताकद नाही तर उमेदवाराची पात्रता हाच प्राथमिक विचार असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

eknarh shinde 696x389 1

मुंबईत शाखाप्रमुखांच्या बैठकीनंतर शिंदे असं म्हणाले होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मुंबईचा महापौर हा महायुतीतील असेल. महायुतीमध्ये शिवसेनेला पूर्ण आदर मिळेल. आमचे प्राधान्य महायुतीने एकत्र येऊन बीएमसी निवडणुका जिंकाव्यात. जागांच्या संख्येपेक्षा योग्य आणि सक्षम उमेदवार उभे करावेत हे महत्त्वाचे आहे जागावाटप करताना वार्डामधील संबंधित पक्षातील ताकद पाहिली जाईल. त्यानुसार तिकीट मिळेल’, ‘जिथे विजय निश्चित आहे, तिथेच जागा लढवाव्यात. जर हे तत्व पाळले गेले तरच महायुतीचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकेल’, असंही शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी आपल्या विधानाद्वारे स्पष्ट केले की भाजपला “मोठा भाऊ” बनवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही, तर युतीची एकता सर्वोपरि आहे. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या बीएमसी निवडणुकीची तयारी करण्यासाठी शिवसेना मतदारसंघनिहाय बैठका घेत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. त्यांनी शाखाप्रमुखांना “लोकांना भेटून त्यांच्या समस्या ऐकण्याचे आवाहन केले.तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना २०२२-२०२४ दरम्यान त्यांच्या सरकारचे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यास सांगितले.

दरम्यान मिळालेल्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये २२७ जागांपैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांनाही जवळपास १०० च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटप कळीचा मुद्दा ठरेल, यात शंकाच नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now