⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

एकनाथ शिंदे माझं ऐकतील.. माझा विश्वास आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जळगाव लाईव्ह न्यूज । एकनाथ शिंदे माझा ऐकतील याचा मला विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना घातली आहे. यावेळी ते महाविकास आघाडीतल्या आमदारांशी बोलत होते. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या मधील फोनवर चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी शिंदे यांच्याशी चर्चा करताना शिंदे यांनी आपल्या ठाकरे यांना सांगितले असल्याचे समजत आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवर ही चर्चा झाली. यावेळी मला मंत्रिपद नको आहे. पण भाजपा सोबत युती करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावर उद्धव ठाकरे बोलत होते.

एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या मधील फोनवर चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी शिंदे यांच्याशी चर्चा करताना शिंदे यांनी आपल्या ठाकरे यांना सांगितले असल्याचे समजत आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवर ही चर्चा झाली. यावेळी मला मंत्रिपद नको आहे. पण भाजपा सोबत युती करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र शिवसैनिक नाराज आहेत. यामुळे ते भाजपा आमदारावर नाराज आहेत.

मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते मात्र या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदेसह आमदार नॉटरिचेबल असल्यामुळे त्या ठिकाणी आली नाहीत यामुळे आता ते कोणचा टोकाचं पाऊल उचलतात का? हे पाहणे उत्सुकतेच ठरणार होत. पण मला मंत्री करू नका पण भाजपा सोबत युती करा अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र शिंदे माझं ऐकतील असा उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अद्याप किती आमदार आणि मंत्री आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेच्या बैठकीत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदे यांना गटनेते पदावरून हटविण्याचा निर्णय झाल्यावर शिंदे यांनी हे ट्विट केले. त्यानंतर शिंदे यांची भेट नारवेकर यांनी घेतली यावेळी त्यांनी फोन वरून शिंदेंशी चर्चा केली.