10वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी! मुंबई ‘बेस्ट’ अंतर्गत शेकडो पदांसाठी भरती; भरघोस पगार मिळेल

जुलै 9, 2026 4:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । मुंबईत नोकरी करू इच्छिणाऱ्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रम’ (BEST) अंतर्गत ‘बस वाहक’ (Bus Conductor) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. BEST Mumbai Bharti 2026

best mumbai bharti

या भरती अंतर्गत 364 जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही चांगली संधी असून इच्छुक उमेदवारांनी 29 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. BEST Mumbai Recruitment 2026

पात्रता काय?

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे बस वाहक परवाना आणि बिल्ला असणे बंधनकारक आहे. तसेच शारीरिक पात्रतेनुसार उमेदवाराची उंची 154 ते 178 सेंटीमीटर आणि वजन किमान 45 किलो असावे.

वयाची अट व अर्ज शुल्क :

29 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹1,000, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹900 परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

इतका पगार मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना मूळ वेतन ₹22,060 मिळणार असून त्यासोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, गणवेश धुलाई भत्ता, रजेचे रोखकरण, रजा प्रवास भत्ता तसेच BEST बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सर्व भत्त्यांसह एकूण मासिक वेतन सुमारे ₹36,000 इतके असणार आहे.

ही भरती मुंबई येथे होणार असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 (रात्री 11.55 वाजेपर्यंत) आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून या भरतीची संधी साधावी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now