महादेव हॉस्पिटलमध्ये ११ जुलै रोजी हृदयविकार तपासणी व उपचार शिबिर

जुलै 9, 2026 5:56 PM

जळगावात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी

जळगाव लाईव्ह न्यूज । हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार एम डी डीएनबी कॉर्डीओलॉजी यांची नियमित ओपीडी आता जळगाव येथे सुरू होत आहे. दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, आकाश वाणी चौक विद्यानगर, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रुग्णांची तपासणी, निदान व उपचार केले जाणार आहेत.

Mahendra Singh Parihar

या महिन्यातील ओपीडी शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.डॉ. परिहार हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट तसेच जन्मजात हृदयरोग तज्ज्ञ असून हृदयविकाराच्या आधुनिक उपचारांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे. या विशेष ओपीडीमध्ये छातीत दुखणे, हृदयाची धडधड वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांसमोर अंधार येणे, हार्ट अटॅकची शंका, वारंवार खोकला किंवा थकवा येणे, हृदयाचे ठोके अनियमित किंवा वेगाने पडणे, घबराट होणे, दम लागणे, हात-पायांवर सूज येणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे अशा विविध हृदयविकाराशी संबंधित तक्रारींवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

तसेच बालकांमधील जन्मजात हृदयरोगांचे निदान करण्यासाठीही विशेष सुविधा उपलब्ध राहणार आहे. वारंवार सर्दी-खोकला किंवा न्यूमोनिया होणे, दूध पिताना घाम येणे, वजन न वाढणे, रडताना किंवा खेळताना दम लागणे, मूल निळे पडणे, सतत चिडचिड करणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता पालकांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. परिहार यांनी सांगितले.

महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अ‍ॅडल्ट व पेडियाट्रिक २डी इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, होल्टर मॉनिटरिंग, कोरोनरी व पेरिफेरल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर बसविणे, डिव्हाईस क्लोजर, बलून व्हॉल्व्होटॉमी तसेच बायपास आणि ओपन हार्ट सर्जरीची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.रुग्णांनी पूर्वनोंदणी करून वेळेवर तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१७०४०५० | | ७०२०३७८५१८ या नंबरवर संपर्क करावा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now