महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

जुलै 9, 2026 6:06 PM

शासकीय योजनांमध्ये शस्त्रक्रियेशिवाय किंवा कमी वेदनेत मोफत प्रभावी उपचार

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक मूत्ररोग उपचार सेवा आता महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे उपलब्ध झाली आहे. लेसर व एंडोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूत्रपिंडातील खडे तसेच प्रोस्टेट ग्रंथीची वाढ यावर अत्यंत सुरक्षित, प्रभावी आणि कमी वेदनादायी उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

MHD

मूत्रमार्गातील खड्यांसाठी आर.आय.आर.एस. त्याचप्रमाणे, वयोमानानुसार होणार्‍या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर टीयूआरपी या आधुनिक एंडोस्कोपिक पद्धतीने उपचार केले जातात. महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या या आधुनिक उपचारांचे प्रमुख फायदे म्हणजे शरीरावर कोणताही मोठा चीरा लागत नाही, कमी रक्तस्त्राव, कमी वेदना, कमी कालावधीत उपचार पूर्ण होणे, संसर्गाचा धोका कमी असणे आणि रुग्णाची जलद प्रकृती सुधारणा हे आहेत.

विशेष म्हणजे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजन तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाअंतर्गत पात्र रुग्णांसाठी प्रोस्टेट शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.या उपचारांसाठी डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षल चव्हाण, डॉ. श्रीकांत रेड्डी आणि डॉ. शुभम चौधरी हे अनुभवी मूत्ररोगतज्ज्ञ सेवा देत आहेत. मूत्रपिंडातील खडे, लघवी करताना त्रास, लघवी अडणे, वारंवार लघवी होणे, लघवीत रक्त येणे किंवा प्रोस्टेटशी संबंधित त्रास असलेल्या रुग्णांनी विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महादेव हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.संपर्क :महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव=न्न ०२५७-२२३१००७ | ९४२१४ ९३९४३

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now