जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनात दाखल होत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. आता यांनतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले असून नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे काय जबाबदारी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम यश मिळालेय. महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यांनतर आता महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय.
यातच महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची आज मुदत संपणार असल्याने नवे सरकार स्थापन होण्याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं बोलत जात होते. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे.