⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | राजकारण | Eknath Shinde In Guwahati : चंद्रकांत पाटील चार आमदारांसह गुवाहटीला रवाना

Eknath Shinde In Guwahati : चंद्रकांत पाटील चार आमदारांसह गुवाहटीला रवाना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । शिवसेनेत फूट पाडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सुमारे ४६ आमसरांसह गुवाहाटी येथे दाखल झाले असल्याचे सांगितले जात असताना आता त्यांच्या पाटोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील चार आमदारांसह गुवाहटीला रवाना झाल्याचे सांगितले जातेय. चंद्रकात पाटील हे गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी एक नवे ट्विट करीत थेट प्रतोदांचा आदेश आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. त्यांनी नव्या मुख्य प्रतोदची नियुक्ती केली आहे. तसेच त्यांनी उपसभापती नरहरी झिरवळ यांना 34 आमदारांच्या (MLA) स्वाक्षऱ्यांचं पत्र पाठवलं आहे. यावरुन शिंदेंसोबत तेवढे आमदार कन्फर्म असल्याचा अर्थ काढला जातोय. यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर पुन्हा मेठा पेच निर्माण झालाय. एकनाथ शिंदे यांनी 34 आमदारांचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना पाठवून भरत गोगावले हे आमचे मुख्य प्रतोद असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, काल शिवसेनेनं सतरा आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांसमोर देऊन अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर शिंदे गटातील आमदारांनी आक्षेप घेतला होता.

एकीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशा दिला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेनेतच आहोत. आमच्या आमदारांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. तसंच आम्ही पक्ष सोडलेला नाही असं स्पष्ट केलंय. त्याचवेळी आपल्यासोबत तब्बल 46 आमदार असल्याचा दावाही शिंदे यांनी केलाय.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह