आगामी निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदेनी डाव टाकला ; ‘या’ पक्षासोबत केली युती

जुलै 16, 2025 4:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२५ । महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडामोड घडेल काहीच सांगता येत नाही. मागील काळात झालेल्या निवडणुकांमध्ये बरेच नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. यांनतर आता सर्वांचे लक्ष राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षानी कंबरही कसली आहे. यातच आगामी निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा राजकीय डाव टाकला आहे.

eknath shinde cm

एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे. ही युती मुंबईतील दलित आणि मराठी मतांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होणार असून या वेळी मुंबई माहपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक भाजपा, ठाकरे गट, शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई जिंकण्यासाठी मोठी खेळी केली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातून आंदराज आंबेडकर यांच्याशी युती केली आहे.

दोन्ही नेत्यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली आहे. युतीची घोषणा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच जागावाटपाचा फॉर्म्यूला काय असेल यावरही भाष्य केलं.

आम्ही दोघेही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे…

भूतकाळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली होती. नंतर मात्र ही युती टिकली नाही. भविष्यात तुमचीही युती कायम राहील हे कशावरून? असा सवाल एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. यावर शिंदे यांनी भविष्यातही आमची युती कायम राहील, असा विश्वास केला. तसेच, आम्हाला एकमेकांवर विश्वास आहे. कार्यकर्त्यांचे विचार जुळत आहेत. आम्ही दोघेही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमच्या महायुतीत कुठेही अडचण येणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now