---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

15 दिवसात भाजपात प्रवेश करणार ; एकनाथ खडसेंची कबुली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे स्वगृही भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून स्वतः एकनाथ खडसे यांनीच याबाबत माहिती दिली होती.

khadse bjp jpg webp

मी भाजपात प्रवेश करणार आहे, अशी कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भावनिक वक्तव्य केलं. मी शरद पवार यांचा ऋणी राहीन. त्यांनी मला संकटकाळात मदत केली. येत्या 15 दिवसात दिल्लीत भाजपात प्रवेश करणार, असं एकनाथ खडसे म्हणाले.

---Advertisement---

दरम्यान, दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांच्याशी चर्चा करून एकनाथ खडसे आज त्यांच्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, आपण लवकरच येत्या पंधरा दिवसात भाजप मध्ये प्रवेश करणार आहे. कोणत्याही अटीशर्ती शिवाय मी प्रवेश करणार आहे. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल”, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

भाजप हे माझे घर आहे. चाळीस वर्षे मी भाजपमध्ये राहिलो असून भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणमध्ये माझं योगदान राहीलं आहे. काही नाराजीमुळे मी बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाल्याने मी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी संकटकाळात साथ दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता जी परिस्थिती आहे ती पाहता मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सांगितली आहे. त्यांची अनुकूलता पाहून मी भाजपमधे जाण्याचा हा निर्णय घेतला असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---