---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरसंदर्भात नाथाभाऊंचं मोठं वक्तव्य

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२४ । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरसंदर्भात भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसेंनी मोठ वक्तव्य केले आहे. सरकार बनविण्यासाठी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या मदतीची गरज भासू शकते आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही नेत्यांना काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या सोबत येण्याची ‘ऑफर’ दिली असावी, असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. आपला भाजप प्रवेश लोकसभा निवडणुकीनंतर होईल, असेही ते म्हणाले.

khadse modi pawar jpg webp

शरद पवार यांनी देशातील काही छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे म्हटले होते. त्यानंतर मोदी यांनी, नंदुरबारमधील सभेत बोलताना, शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या सोबत यायला हवे, असे मत व्यक्त केले होते. तो संदर्भ घेऊन, देशात सत्ताविरोधी लाट असल्यामुळे शरद पवार व उद्धव ठाकरेंची सरकार बनविण्यासाठी मदत लागू शकते म्हणून मोदींनी त्यांना ‘ऑफर’ दिली असावी, असे खडसे वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.

---Advertisement---

तसेच पुढच्या राजकारणाची नांदी असावी. राजकारणात काहीही होऊ शकते हे आपण सर्वांनी आतापर्यंत पाहिले आहे. त्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. एखाद्या वेळेस सरकारला मदत लागू शकते. मोदींच्या वक्तव्याचा अर्थ ज्याचा त्याचा त्याने काढावा. आगामी काळात असे घडले तर आश्चर्य वाटणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

दरम्‍यान, भाजप पक्ष प्रवेशाबाबत वरिष्ठांनी अनुकुलता दर्शवली आहे. काहींनी नाराजी दर्शवली होती. माझ्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चा या केवळ निवडणुकी पुरत्या नाहीत. निवडणुका संपल्यावर माझा पक्ष प्रवेश होणार म्हणजे होणारच आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---