---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र राजकारण

‘टायगर अभी जिंदा है’.. ; एकनाथ खडसेंच्या जाहिरातीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । नुकतेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यात जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. भाजपला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस वासी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता रक्षा खडसे यांच्या विजयानंतर समीकरणं बदलली. यातच जळगावच्या वर्तमानपत्रात एकनाथ खडसे यांच्यावर एक जाहिरात प्रसिद्ध झाली. ‘टायगर अभी जिंदा है’ असा डायलॉग लिहीलेली ही जाहिराच पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत .

khadse advt jpg webp

मात्र एकनाथ खडसे यांच्या मित्रपरिवार आणि समर्थकांकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना डिवचण्यात आल्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जळगावात रंगली आहे. यामुळे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा वाक् युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

---Advertisement---

काय आहे ही जाहिरात?
जळगावच्या वर्तमानपत्रात एकनाथ खडसे मित्रपरिवार समर्थकांकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात ‘टायगर अभी जिंदा है’ असा डायलॉग लिहिलेला आहेत. एवढंच नव्हे तर ‘ एहसास से मजबूर ना समझो गुलशन से बहुत दूर ना समझो मुझको, मै आज भी इतिहास बदल सकता हू इतना भी कमजोर ना समजो मुझको’ असेही या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

एका अर्थी एकनाथ खडसे यांचा करिश्मा आणि ताकद अद्याप अभेद्य असल्याचेच या जाहिरातीतून दर्शवण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष गिरीश महाजन यांना उद्देशूनच ही जाहिरात असल्याची चर्चाही सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याच्या विरोधकांकडून गप्पा केला जात होत्या. त्यावर खडसे समर्थकांकडून जाहीरितच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---