रिपाइं जिल्हाध्यक्षसह आठ जण दोन वर्षांसाठी तडीपार

ऑगस्ट 18, 2021 10:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१ । आगामी सण उत्सव आणि मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता भुसावळ रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह आठ जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. यासंबंधीचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा काढण्यात आले. बाजारपेठ पोलिसांनी लागलची या सर्वांना नोटीस बजावली आहे.

jalgaon live default featured

हे ८ जण होणार हद्दपार
रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी, दीपक भागवत सूर्यवंशी, रोहन राजू सूर्यवंशी, हर्षल कैलास सोनार (रा. संभाजी नगर, भुसावळ), शेख इम्रान शेख गुलाम रसुल (पंधरा बंगला, भुसावळ), किशोर भागवत सूर्यवंशी, छोटू भागवत सूर्यवंशी, आनंद भागवत सूर्यवंशी (तिन्ही रा. प्रल्हाद नगर, भुसावळ)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now