⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

खुशखबर ! खाद्यतेल पुन्हा एकदा स्वस्त होणार, सरकारची आज महत्त्वाची बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । सरकारकडून देशातील जनतेला पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळू शकतो. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमतीत कपात केल्यानंतर पुन्हा एकदा खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती खाली आणण्यासाठी आज बुधवारी सरकारची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत तेल उत्पादकांसह निर्यातदारांनाही पाचारण करण्यात येणार आहे. या बैठकीत सरकार तेल विक्रेत्यांना एमआरपी बदलण्याचे आदेश दिले जाणार आहे.

जनतेला मोठा दिलासा मिळणार
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. अशा स्थितीत या कमतरतेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, असा सरकारचा मानस आहे. आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. याआधीही खाद्यतेलाच्या दरात लिटरमागे 10 ते 15 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

कमी किंमतीचे कारण
गेल्या काही दिवसांत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, काही देशांनी खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यामुळे त्यांच्या जागी पुरेसा साठा आहे. आता बंदी उठवल्यानंतर हे तेल बाजारात आल्यावर घसरण झाली आहे. दुसरीकडे सोयाबीनचे पीकही बाजारात येणार आहे. यामुळेही किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून तेलाच्या दरात घसरण झाली. आता पुन्हा सुमारे २० ते २५ रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांपूर्वी १५५ रुपये लिटरवर असलेले सोयाबीन तेल आता १३५, तर १८२ ते १८५ रुपयांवर असलेले सूर्यफूल तेल १६४ रुपयांवर घसरले आहे. शेंगदाणा तेल मात्र महिनाभरापासून १६२ ते १७० रुपये लिटरवर स्थिर आहे. त्यामुळे बहुतांश ग्राहक शेंगदाणा तेलाएेवजी सोयाबीन व सूर्यफूल तेल खरेदीला प्राधान्य देतात.