⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अफगाणिस्तानमध्ये भूकंप : २५५ नागरिकांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून त्यात २५५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा आकडा जास्त असू शकतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी आहे. मोठे नुकसान अपेक्षित आहे.अफगाण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भूकंपामुळे देशात मोठ्या प्रमाणावर घरे कोसळली आहेत आणि ढिगाऱ्यांमुळे किमान 255 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बचावकार्य सुरू करण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी दोन दशकांच्या युद्धातून मुक्त झालेल्या अफगाणिस्तानवरील हे दुसरे मोठे संकट असू शकते. अफगाणिस्तानची अधिकृत वृत्तसंस्था बख्तरने आपल्या अहवालात २५५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.गेल्या वर्षी दोन दशकांच्या युद्धातून मुक्त झालेल्या अफगाणिस्तानवरील हे दुसरे मोठे संकट असू शकते. अफगाणिस्तानची सरकारी वृत्तसंस्था बख्तरने आपल्या अहवालात २५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की घटनास्थळी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत. युरोपीयन एजन्सी ईएमएससीने म्हटले आहे की, हे धक्के ५०० किमीच्या परिघात जाणवले. त्यात भारताच्या काही भागांचाही समावेश असू शकतो.