फ्रेंड्स ऑफ बीजेपी, जळगावतर्फे असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड शिबिर 

 जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२३ । भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच फ्रेंड्स ऑफ बीजेपी, जळगावच्यावतीने असंघटित कामगारांसाठी न्यू जोशी कॉलनी येथे फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या जिल्हा संयोजिका तथा बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुधा काबरा यांच्या नेतृत्वात मोफत ई श्रम कार्ड शिबिर घेण्यात आले.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, भविष्यात विविध योजना असंघटित कामगारांपर्यंत ई श्रम कार्डद्वारे पोहचविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शिबिर यशस्वितेसाठी नंदिनी दर्जी, राजेश्री शर्मा, संगीता पाटील आणि सुनीता चौधरी आदींनी परिश्रम घेतले. या शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला.