खुशखबर! ‘या’ लोकांच्या खात्यात लवकरच जमा होणार 1000 रुपये

नोव्हेंबर 19, 2022 4:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । तुम्ही देकील ई-लेबर कार्डधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही हे कार्ड असेल तर आता लवकरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. सरकारकडून कार्डधारकांना दरमहा 500 रुपये दिले जातात. तुम्हालाही या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता.

indian currency

श्रेणीत येणारे लोक कोण आहेत?
रस्त्यावरील विक्रेते, नाई, धोबी, रिक्षाचालक, हातगाडी चालक, शिंपी, मोची, फळ विक्रेते, भाजी विक्रेते अशा अनेकांचा ई-लेबर कार्डच्या श्रेणीत समावेश आहे.

11 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे
आतापर्यंत सुमारे 11 कोटी लोकांनी ई-श्रमिक पोर्टलवर नोंदणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच 500 रुपयांचा पुढील हप्ता हस्तांतरित करू शकते. ही रक्कम थेट खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.

30 जानेवारीपर्यंत नोंदणी करा
तुम्हालाही 500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही 30 जानेवारीपर्यंत नोंदणी करू शकता. याशिवाय ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांनी त्यांची पडताळणी करून घ्यावी.

या कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो-
ई-लेबर कार्डसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकाचे वय १६ ते ५९ वर्षे दरम्यान असावे.
ती व्यक्ती असंघटित क्षेत्राच्या श्रेणीत आली पाहिजे.
याशिवाय इतर कोणत्याही सरकारी योजनेशी संबंधित असू नये.
यासोबतच EPFO ​​किंवा NPS चे सदस्य नसावेत.

2 लाखांचा लाभ मिळेल
या योजनेत नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मिळतात. याशिवाय अंशत: अपंगत्वावर 1 लाख आणि अपघात कव्हरेजची सुविधाही उपलब्ध आहे.

अधिकृत वेबसाइट तपासा
या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट https://eshram.gov.in/ ला भेट देऊ शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories