सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. विशेष या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता ऑनलाईन अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025 आहे.

कोणती पदे भरली जाणार?
1) कनिष्ठ आरेखक (गट-क) 28
2) अनुरेखक (गट-क) 126

शैक्षणिक पात्रता:
कनिष्ठ आरेखक (गट-क) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
अनुरेखक (गट-क) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.












