---Advertisement---
एरंडोल गुन्हे

पिंपळकोठा नजीक भीषण अपघात : कंटेनर-ट्रकची समोरासमोर धडक ; दोन्ही चालक ठार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२३ । जळगावातून गेलेल्या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळून गेलेल्या महामार्गावर भीषण अपघातात झाल्याचं समोर आलं आहे. औषधे घेऊन जाणा-या कंटेनरने समोरून येणा-या ट्रकला जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहनांवरील चालक ठार झाले. दरम्यान, अपघातानंतर कंटेनरने पेट घेतल्यामुळे त्यामध्ये असलेली औषधी जळून खाक झाली. ही घटना आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती

pimpalkotha accident jpg webp webp

काय आहे नेमकी घटना?
आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिंपळकोठा गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर धुळ्याकडून जळगाव कडे जात असलेल्या टॅकर क्रमांक (एम,एच.३४ बीजी ९८३७) ला जळगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक एन.एल.०१ क्यू ७१५१ ने समोरून जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहनावरील चालक बिंदू मेहताब देहारीया व संतोषकुमार राजाराम यादव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला

---Advertisement---

दरम्यान, या अपघातानंतर कंटेनरमध्ये असलेल्या औषधी व खोक्यांनी पेट घेतला.अपघातग्रस्त कंटेनरमध्ये शासकीय रुग्णालयाची औषधी असल्याचे समजते.अपघात परिसरात सर्वत्र औषधी विखरून पडल्या होत्या. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल,हवालदार काशिनाथ पाटील,अकिल मुजावर व त्यांचे सहकारी अपघातस्थळी दाखल झाले व त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व हॉटेलमधील कामगार यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधून गंभीर जखमी झालेल्या चालकांना बाहेर काढले आणि एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रवाना केले.उपचार सुरु असतांना दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. याबाबत लहू चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---