DRDO मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी मोठी पदभरती

सप्टेंबर 27, 2025 12:57 PM

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत म्हणजेच DRDO मध्ये प्रशिक्षणासाठी अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर drdo.gov.in जाऊन अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२५ आहे.

drdo bharti 2022 jpg webp

डीआरडीओमधील या भरती मोहिमेत १९५ पदे भरली जाणार आहे. यामध्ये ४० ग्रॅज्युएट अप्रेंटिस, २० टेक्निकल अप्रेंटिस पदे भरती केली जाणार आहे. १३५ आयटीआय ट्रेड अप्रेंटिस पदे भरती केला जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी संबंधित शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी. मॅकेनिकल आणि केमिकल विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराकडे इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निकल अप्रेंटिस पदासाठी तुम्ही डिप्लोमा प्राप्त केलेली असावा.

पगार

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८पेक्षा कमी नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि स्कील्सच्या आधारे केली जाणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी ९००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. डिप्लोमा पदासाठी ८००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now