⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

डॉ. अब्दुल सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्यातर्फे संभाजी नाट्यगृह महाबळ येथे डॉ. अब्दुल सालार यांना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार सुपर सिद्ध प्राचार्य डॉ. अशोक राणा व निताताई आमले यांच्या शुभहस्ते शॉल, बुके व स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यानगरीचे संपादक विकास भदाणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ माधवराव पाटील यांनी केले. या संस्थेच्या वतीने आरोग्य सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जगन्नाथ पाटील यांनी केले.

यावेळेस गुलाबराव देवकर म्हणाले की, पुरस्कारांची आम्हाला अभिमान आहे. पुरस्कार हे त्यांचे सामाजिक बांधिलकी जोपासल्याची पोचपावती आहे. पुरस्कार मिळाल्यावर पुरस्कारार्थी अधिक जोमाने सामाजिक कार्य करतो व ते नवीन पिढी करिता दीपस्तंभ असतात. कार्यक्रमात डॉ. करीम सालार, श्रीराम पाटील, मारुती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. इक्बाल शाह, एजाज मलिक, अब्दुल अजिज सालार, डॉक्टर ताहेर, नबी दादा बागबान, प्रा. जफर शेख, अब्दुल रशीद शेख, तारीक अन्वर शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीताने करण्यात आले.

यांना पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील शहीद राजू साळवे यांच्या धर्मपत्नी, डॉ. अब्दुल सालार, संतोष भंडारी, उद्योगपती राम पाटील, डीवायएसपी मारुती जाधव, ऍड. ललिता पाटील, ईश्‍वर पाटील, योगेश देसाई, लक्ष्मण डोळे, विद्या करपे अशा कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.