स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना अध्यक्षपदी डॉ.राजेंद्रसिंग परदेशी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । औरंगाबाद येथील स्त्रीरोग तज्ञ असलेले डॉ.राजेंद्रसिंग संतोषसिंग परदेशी (जोनवाल) यांची, दहा हजारांहून अधिक सदस्य असलेल्या, स्त्रीरोग तज्ञांच्या अखिल महाराष्ट्र प्रसूतीशास्त्र व स्रीरोगतज्ञांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

dr pardeshi jpg webp

ते बांबरूड (पाटस्थळ) येथील मूळ रहिवासी आहेत. अॅनिमिया(रक्तक्षय) कमी करणे, प्रसूतीदरम्यान होणारा माता मृत्यूदर कमी करणे, वंध्यत्व निवारण, अशा इतर अनेक स्त्रियांच्या समस्यांवर ही संघटना व्यापक प्रमाणावर कार्य करत आहे. भडगाव तालुक्यातील बांबरुड पाटस्थळ येथील रहिवाशी जिजाबाई परदेशी यांचे सुपुत्र असलेले डॉ.राजेंद्रसिंग परदेशी यांचे अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now