जळगाव लाईव्ह न्यूज |६ डिसेंबर २०२२ | जळगाव शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांच्या बदलीच्या निर्णयाला मॅट कोर्टाने स्थगिती दिली आहे.असे असले तरी महानगरपालिकेतील काही नगरसेवकांना त्या आयुक्त म्हणून नको आहेत. पर्यायी डॉ. विद्या गायकवाड पुन्हा आयुक्त पदी विराजमान झाल्या. तर त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात येईल असे म्हटले जात आहे.
महानगरपालिकेमध्ये सध्या दोन-दोन आयुक्त नियुक्त केले गेले आहेत. देविदास पवार यांना शासनाने आयुक्त म्हणून नियुक्ती केली. तर डॉ.विद्या गायकवाड यांचा पदभार काढताना त्यांना नवीन नियुक्ती न देत प्रतीक्षा ठेवण्यात आले. पर्यायी विद्या गायकवाड यांनी मॅच कोर्टात धाव घेतली आणि मॅट कोर्टाने त्यांच्या बदलीच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. मात्र याबाबतचा अजून अंतिम निर्णय झालेला नसून 9 डिसेंबर रोजी अंतिम निर्णय होणार आहे यामुळे नक्की आयुक्त कोण राहणार डॉ. विद्या गायकवाड की देविदास पवार याबाबत नऊ डिसेंबर रोजीच माहिती मिळणार आहे.
मात्र अशावेळी जर आयुक्त पद हे डॉ विद्या गायकवाड यांना मिळालं तर त्यांच्या विरोधात एकमताने अविश्वास ठराव आणला जाईल असे म्हटले जात आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे सर्व एकत्रित येऊन हा अविश्वास ठराव आणतील असे म्हटले जात आहे. मात्र याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
तरी याबाबत भाजप नेते डॉ. अतुल सिंह हाडा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, नगरसेविका सुचिता हाडा यांनी एकंदरीतच कशाप्रकारे डॉ विद्या गायकवाड या चुकीचा कारभार करत आहेत हे वेळोवेळी सांगितले आहे. महासभेत त्यांनी पहिल्यांदा आवाज उचलला होता. अशावेळी शहराच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतला जाईल.
याच बरोबर नगरसेवक ऍड. दिलीप पोकळे म्हणाले कि, आयुक्त विद्या गायकवाड यांचा कारभार अकार्यक्षम म्हणता येईल. लोकहिताचे निर्णय रखडले आहेत. पर्यायी जर त्या परत आल्या तर आम्हाला लोकहिताच्या आणि शहराच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा लागेल.