Accident : नाशिकजवळ पवन एक्सप्रेस घसरली, एक प्रवाशी ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । मुंबईहून जयनगरकडे निघालेल्या पवन एक्सप्रेसचे ७ ते ८ डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना आज दुपारी ३ ते ३. ३० वाजेच्या सुमारास नाशिकमधील देवळाली- लहवीत दरम्यान ही घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त टाइम्सने दिले आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
लोकमान्य टिकल टर्मिनस मुंबई येथून जयनगरकडे निघालेली डाऊन 11061 पवन एक्सप्रेसचे काही डबे लहावीट-देवळाली दरम्यान घसरले आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून काही प्रवासी जखमी झाले असल्याचे समजते. या अपघामुळे अप लाईनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. भुसावळातील वरीष्ठ अधिकार्यांसह कर्मचारी तसेच एआरटी टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.
रेल्वेचे ७ डबे घसरल्याची माहिती समोर येत आहे. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. अपघातामुळे अनेक गाड्या खोळंबणार असून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ प्रक्षेपण :