मंगळवार, डिसेंबर 5, 2023

अपात्र आमदार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले ‘हे’ आदेश..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२३ । शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यावेळी न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सादर केलेल्या नव्या वेळापत्रकावरही सर्वोच्च न्यायालयालयानं आजच्या सुनावणीत नाराजी व्यक्त केली. तसेच, 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. एक प्रकारचा थेट अल्टिमेटमच न्यायालयानं आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे.