जळगावात इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या ‘त्या’ वृद्ध महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 29, 2023 4:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरात तीन मजली जुनी इमारत कोसळल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक वृद्ध महिला अडकली होती. दरम्यान, पाच तासांच्या बचाव कार्य तसेच शोध मोहिमेनंतर महिला सापडली असून त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. राजश्री सुरेश पाठक वय ७५ असे या मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे.

jLG jpg webp

काय आहे घटना
जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मशिदीसमोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत आज सकाळी ८.३० च्या सुमारास अचानक कोसळली. यात एकूण चार जण या इमारती खाली अडकले होते. त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले. तर एक ७५ वर्ष वय असणारी महिला या इमारतीखाली अडकली होती. तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.

दरम्यान तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जयश्री पाठक यांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now