⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; जळगावातील दोघांविरोधात गुन्हा

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; जळगावातील दोघांविरोधात गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे गुन्हे दाखल होत आहेत. यात आता काल जळगाव जिल्ह्यातील दोघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी (Ashok Ladwanjari) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अंकीत प्रल्हाद पाटील व हरीष कोळी (दोघांचे पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) या दोघा संशयितांनी स्वत:च्या समाजमाध्यमाच्या अकाउंटवरुन शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकुर प्रसिद्ध केला होता. हा प्रकार लक्षात येताच लाडवंजारी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयितांच्या समाजमाध्यमावरील खात्याची तांत्रिक माहिती काढली आहे. लवकरच यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

केतकी चितळेचे सर्व अकाऊंट ब्लॉक करा
अभिनेत्री केतकी चितळे, अडॅ. नितीन भावे यांनी देखील समाजमाध्यमातून पोस्ट करुन खासदार शरद पवार यांची बदनामी केली आहे. केतकी हिने वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे. त्यामुळे तिचे समाजमाध्यमावरील सर्व अकाऊंट कायमस्वरुपी ब्लॉक करावे. पोलिसांनी कठोर कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात ती अशाप्रकारचे कृत्य करणार नाही. तिचे मानसिक संतुलन तपासून घ्यावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसांना दिले आहे.

author avatar
Tushar Bhambare