देवळालीला नेहेमीच करता ट्रेनने प्रवास ? तर तुमच्यासाठी आहे गुड न्यूज

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पर्यायी शाळांना सुट्या लागल्या आहेत. पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या वाढली असल्याने रेल्वे गाड्यांना मोंठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून देवळाली रेल्वे स्थानकावर एलटीटी पटना (13202 व 13201) व मुंबई अमृतसर एक्स्प्रेस (11057 व 11058) या दोन गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून थांबे देण्यात आले आहे.

indian railway

देवळाली येथे दोन गाड्यांना थांबा दिल्याने देवळाली येथून येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच गुजराथमधून महाराष्ट्रात येणार्‍या गाड्यांना सुध्दा मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उधना-बरौनी एक्स्प्रेस ही विशेष गाडी सुरू केली आहे.

ही गाडी 3 ते 31 मे या काळात धावणार आहे. ही गाडी भुसावळ विभागातील जळगाव, भुसावळ खंडवामार्गे धावणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now