
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून, मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्याशी चर्चा करून पुढील योग्य तो निर्णय घेतला जाईल.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांची भूमिका काय राहणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी गुलाबराव पाटील यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.





