जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढेरे

जून 7, 2024 10:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । जळगाव महापालिका आयुक्तपदी सांगलीचे जिल्हा अधिकारी प्रशासन ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी उपसचिव यांनी ज्ञानेश्वर ढेरे नियुक्ती आदेश काढले. ढेरे हे आज शुक्रवारी जळगाव मनपात रुजू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ढेरे हे मनपाचे सतरावे पूर्णवेळ आयुक्त असतील.

jalgaon manapa

डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीनंतर आयुक्त पदाची जागा रिक्त झाली होती. पुन्हा या पदावर नियुक्ती मिळावी म्हणून गायकवाड या ‘मॅट’मध्ये गेल्या होत्या. मात्र, काही तारखांनंतर त्यांनी ‘मॅट’ मधून अर्ज मागे घेतला होता. दरम्यान, प्रभारी आयुक्त म्हणून पल्लवी भागवत या धुरा सांभाळत होत्या. गुरुवारी शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी ढेरेंच्या नियुक्तीचे आदेश काढले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now