जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाच्या सरकारी नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात विविध पदासाठी मोठी पदभरती सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजे 09 जुलै 2025 (11:55 PM) पर्यंत आहे.

या पदांसाठी होणार भरती?
1) ग्रंथपाल 05
2) आहारतज्ञ 18
3) समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) 135
4) भौतिकोपचार तज्ञ 17
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181
6) ईसीजी तंत्रज्ञ 84
7) क्ष किरण तंत्रज्ञ 94
8) सहायक ग्रंथपाल 17
9) औषधनिर्माता 207
10) दंत तंत्रज्ञ 09
11) प्रयोगशाळा सहायक 170
12) क्ष किरण सहायक 35
13) ग्रंथालय सहायक 13
14) प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर 36
15) वाहन चालक 37
16) उच्च श्रेणी लघुलेखक 12
17) निम्न श्रेणी लघुलेखक 37
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी
पद क्र.2: BSc (Home Science) किंवा समतुल्य
पद क्र.3: MSW
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी पदवी
पद क्र.5: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
पद क्र.6: B.Sc (Paramedical Technology in Cardiology/ Paramedical Technology in Cardiology) किंवा B.Sc (Physics/Chemistry/ Biology) + कार्डिओलॉजी डिप्लोमा
पद क्र.7: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.8: कला, वाणिज्य किंवा विज्ञान पदवी
पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डेंटल मेकॅनिकल कोर्स
पद क्र.11: प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा प्रयोगशाळेत पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + लॅब डिप्लोमा
पद क्र.12: रेडिओग्राफीमध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी किंवा रेडिओग्राफीमध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये B.Sc किंवा B.Sc (Physics/Chemistry/Biology) + रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय विज्ञान प्रमाणपत्र
पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके/मध्यम/अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्टहँड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई/महाराष्ट्र
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये फी भरावी लागेल. तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये फी भरावी लागेल.












