गुन्हेजळगाव शहर

अपघाताचे सत्र थांबेना ! जळगावात अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२६ । जळगाव शहरातून गेलेल्या जुन्या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, बांभोरी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.20) सकाळी घडलीय. योगेश महाजन (रा. इच्छदेवी चौक परिसर जळगाव) असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेनंतर शहरातील वाढत्या अवजड वाहतुकीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, इच्छादेवी चौक परिसरातील रहिवासी योगेश महाजन हे गुरुवारी सकाळी ॲक्टीव्हा वाहनावरून जात होते. सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने यात योगेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला.

तरसोद-पाळधी बायपास मार्गाची अवस्था खराब असल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक पुन्हा शहरातून वळविण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी जुन्या महामार्गावर अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

काही दिवसांपूर्वी अजिंठा चौफुलीजवळ टँकरच्या धडकेत भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावरील अवजड वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणण्यात आले नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button