गुन्हेचाळीसगावजळगाव शहर

जळगावातील पोलिस कॉन्स्टेबलने संपविले जीवन; जिल्हा पोलीस दलात खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीय. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचत आयुष्य संपवले. चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथील राहत्या घरामध्ये त्यांनी गळ#$फास घेतला. निलेश पाटील असे आत्म#$हत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले निलेश पाटील हे कोदगावातील राहत्या घरामध्ये गळाफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आले. निलेश पाटील यांचा मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

निलेश यांचा मृतदेह खाली उतरवून चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना निलेश यांच्या घरामध्ये सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली? यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. निलेश पाटील नैराश्येत किंवा तणावात होते का? याचा तपास पोलिस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button