बुधवार, सप्टेंबर 13, 2023

घरात बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तलवारींसह तरुणाला ठोकल्या बेड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई केली. पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या तरुणाच्या घरात छापा टाकत बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तीन तलवारी हस्तगत केल्या. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करत हर्षल विनोद राजपूत (वय-२०) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?
पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात हर्षल विनोद राजपूत हा त्याच्या घरात प्लास्टिक पिशवीमध्ये तीन तलवारी लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

त्यानुसार पथकाने कारवाई करत १० हजार रुपये किंमतीच्या तीन तलवारी हस्तगत केले आहे. तसेच हर्षल विनोद राजपूत आला अटक करत त्याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

पाचोरा/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या तरुणाच्या घरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीरित्या लपवून ठेवलेल्या तीन तलवारी हस्तगत केल्या आहे. त्याच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तरूणाला अटक केली आहे. हर्षल विनोद राजपूत (वय-२०) रा.मोहाडी ता.पाचोरा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.