जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी आज जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनतर्फे राष्ट्रवादी वेलफेअर फंडाला ५० हजारांचा धनादेश देण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा मजूर फेडरेशनतर्फे त्यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी वेलफेअर फंडासाठी ५० हजारांच्या मदतीचा धनादेश देखील ना.अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस नामदेवराव चौधरी, जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनचे सभापती लिलाधर तायडे, उपसभापती प्रकाश पाटील, विनोद देशमुख, मुविकोराज कोल्हे, जिल्हापरिषद सदस्य कैलास चव्हाण, मनोज वाणी आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.