जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2025आहे. District Hospital Jalgaon Recruitment 2025

कोणती पदे भरली जाणार?
1) समुपदेशक – 01 पद
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 02 पद

भरतीसाठी पात्रता काय?
समुपदेशक – पदव्युत्तर पदवी – सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / मानववंशशास्त्र / मानव विकास या विषयात पदवी.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (M.L.T.) मध्ये पदवी किंवा
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (M.L.T.) मध्ये पदविका
डिप्लोमा किंवा पदवी मिळविण्यापूर्वी १०+२ पूर्ण केलेले असावे.
किती पगार मिळेल : समुपदेशक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एकत्रित मानधन रु.२१०००/- मिळेल. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी रु.२५०००/- पगार मिळेल
अर्ज पद्धती : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, पहिला मजला, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव, जि. जळगाव, पिन क्र. ४२५००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2025
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा












