⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | एरंडोलला बचत गटातील महिलांना शिलाई मशीन वितरण

एरंडोलला बचत गटातील महिलांना शिलाई मशीन वितरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल येथे दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानांतर्गत स्वयंरोजगार या घटका अंतर्गत वैयक्तिक व्यवसायासाठी येथील नगरपालिकेतर्फे बचत गटातील महिला सदस्यांना शिलाई मशीन वाटप आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शालिग्राम गायकवाड, बँक ऑफ बडोदा चे मॅनेजर प्रताप मेहेर आनंदा चौधरी, विठ्ठल वंजारी उपस्थित होते.

रूपाली पाटील, कविता पाटीलस शबानाबी शेख, सुनिता चौधरी, रिजवानाबी नूर अहमद शेख, बिस्मिल्ला बी तसलीम शेख, शेख शामिनखाँ सलमा बी, सलीमउद्दीन मुजावर, सुनंदा महाजन या महिला सदस्यांना आमदार चिमणराव पाटील व मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुसुम पाटील यांनी केले विकास पंचबुद्धे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजित भट, विनोद कुमार पाटील, विक्रम घुगे, अशोक मोरे, आनंद दाभाडे यांनी परिश्रम घेतले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह