⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दाखल्यांचे वितरण ठप्प

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी ४ एप्रिलपासून संप पुकारल्याने विद्यार्थ्यांना अधिक बसला आहे. संपामुळे तहसील कार्यालयात सुमारे १३६५ दाखले पडून आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाेबतच पालकांनाही चकरा माराव्या लागत अाहे. संप सुरू झाल्यापासून दाखले वितरण सेवा ठप्प झाली आहे.


दहावी, बारावीच्या परीक्षा आटाेपल्याने पुढील प्रवेशासाठी आवश्यक, दाखले आणि प्रमाणपत्रे काढण्यावर विद्यार्थी आणि पालकांचा भर आहे. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रातून दाखल्यांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले अाहेत. तेथून अर्ज व कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा हाेतात. मात्र, संपामुळे दाखल्यांचे वितरण ठप्प झाले आहे. अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला यासह अन्य कागदपत्रे मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. नायब तहसीलदार वगळता अन्य काेणी कर्मचारी हजर नाहीत.