दिलीप पाटील स्व.सतीश मित्तल पुरस्काराने सन्मानित

डिसेंबर 5, 2021 11:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । मूळचे धरणगाव येथील असलेले व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असलेले दिलीप पाटील यांना स्व.सतीश मित्तल पुरस्कार जाहीर झाला आहे.

Dilip Patil Award jpg webp

दि, 3 जानेवारी 2022 रोजी आष्टी जिल्हा बीड येथे इतिहास संकलन संस्थेच्या अधिवेशनात धरणगाव येथील श्री दिलीप रामू पाटील याना स्व सतीश मित्तल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे,इतिहास क्षेत्रात काम करीत असताना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याना या पुरस्कराने सन्मानित करण्यात येते.

इतिहास संकलन समितीचे भूतपूर्व अध्यक्ष स्व डॉ सतीश मित्तल यांच्यानावाने हा पुरस्कार देण्यात येतो पाचोरा येथील स्व परशुराम कोंडीबा शिंदे यांचे स्मरणार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार या वर्षी धरणगाव येथील श्री दिलीप रामू पाटील यांना घोषित झाला, निवड समिती अध्यक्ष प्रा डॉ राधाकृष्ण जोशी नगर, यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

दिलीप पाटील यांचे चाळीस वर्षाचे संघटनात्मक योगदान, अभाविप ते सहकार भारती व्हाया किसान संघ, त्याचे तरुण भारत, जळगाव जनता बँक, बालाजी विश्वस्त मंडळ धरणगाव,आदी समाज व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम सिनेट पासून ते सदस्य आहेत,एक कार्यकर्ता ते प्रशासक असा हा प्रवास संघर्ष आणि सृजन तेचा आहे या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र,संस्थेचे स्मृती चिन्ह असा आहे,

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now