जळगावात भाजपचा वर्धापन दिन जल्लोषात; आमदार राजूमामा भोळेंच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश

एप्रिल 7, 2026 7:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पक्षाच्या स्थापनेचा हा विशेष दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

pakshpravesh

या कार्यक्रमात माजी नगरसेवक अण्णासाहेब भापसे यांचे सुपुत्र चंद्रकांत भापसे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला.

यावेळी विशाल त्रिपाठी, कार्यालय मंत्री उदय भालेराव,नगरसेवक अजित राणे, राहुल पाटील, नीलूआबा तायडे, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, राजू मराठे, अरुण श्रीखंडे, यांच्या उपस्थितीत भाजप महानगर जिल्हा चिटणीस विठ्ठल पाटील,भाजप महानगर अल्पसंख्याक गुड्डूभाऊ पठाण यांच्या समवेत मा.नगरसेवक अण्णासाहेब भापसे यांचे सुपुत्र चंद्रकांत भापसे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. त्यावेळी उपस्थित शक्तिकेंद्र प्रमुख संजू कोळी, बूथ प्रमुख पंकज सोनवणे आणि भाजप जळगाव महानगर चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now