जळगाव मध्ये भाजपाचा ४६ वा स्थापनादिन उत्साहात साजरा ; ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा महानगर भाजपाच्या वतीने पक्ष स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बळीराम पेठ येथील जी.एम. फाउंडेशन आणि जुने भाजप कार्यालय येथे पक्ष ध्वजवंदन व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

सकाळी ८.३० वाजता ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर मांढरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने झाली. यावेळी पक्षाच्या दिवंगत कार्यकर्त्यांसह ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमात भाजपाच्या ४६ ज्येष्ठ व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये स्मृतिचिन्ह भाजपाचा गमच्या व तांब्याचा दिवा असे सन्मानाचे स्वरूप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाच्या वाढीमध्ये या कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वप्रथम गजानन जोशी, मधुकर मांढरे उदय भालेराव, भगत बालानी, सुनील बढे, कवरलाल संघवी ,अरुण बोरवले, उज्वलाताई बेंडाळे, मुकुंद मेटकर, यशवंत पटेल, लीलाधर ठाकरे, सुनील नारखेडे, विशाल त्रिपाठी, रमेश जोगी, गजानन नेवे,अशोक कोष्टी, किशोर नारखेडे, प्रदिप रोटे, पार्वतीबेन पटेल, रजनी महाजन, महाश्वेता माथुरवैश्य, कुसुमताई सोनवणे, मालतीताई पाटील, बाणाबाई शेवाळे, किसन मराठे ,भाग्यश्री चौधरी, सुशील हसवाणी, बाळू कासार,पुरुषोत्तम वाणी ,मुकुंद कासार, देवानंद बारी, विकास घोडके, संजय भावसार, पुंडलिक सपकाळे, राजेंद्र मराठे, सुभाष सोनवणे, दीप्ती चिरमाडे, यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले प्रमुख मार्गदर्शन जेष्ठ सदाशिव आबा पाटील यांनीजनसंघ ते भाजपा या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन जी जोशी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी सांगितले की भाजप पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिला असून २ खासदारपासून ते 303 खासदारांपर्यंत पक्षाने आपली स्थान प्राप्त केले. तसेच जनतेच्या सर्वसामान्य आश्वासन पूर्ण केले १९८० झालेल्या भाजपच्या स्थापनेला आज ४६ वर्षे पूर्ण होत आहे आणि आज आपण या ४६ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा जो सत्कार करत आहोत. हा त्यामागील त्यांच्या पक्षासाठी त्याग परिश्रम व त्यांनी केलेल्या पक्षासाठी योगदानाबद्दल आजचा सोहळा बघत आहोत
भाजपा पक्ष हा ३६५ दिवस कार्य करणारा पक्ष असून या जेष्ठ कार्यकर्त्यांनी दिलेल्या अथक परिश्रमानेच आज केंद्रात व राज्यात सर्वसामान्य जनतेसाठी व कार्यकर्त्या आपण सुखी व आनंदाचे दिवस पाहत आहोत. यानंतर खा स्मिताताई वाघ, यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी महापौर दिपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील, मनपा सभागृहन येथे नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालानी, उदय भालेराव, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, विशाल त्रिपाठी,राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, महिला अध्यक्ष, नितू परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज भांडारकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप रोपे व सह सयोजक सागर पाटील होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाले












