जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच मालवाहू कंटेनर दिलेल्या धडकेत धरणगावातील वकीलांचा मृत्यू झाला आहे. अॅड.विवेक पाटील (35) असे मय वकीलांचे नाव असून ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजता मानराजपार्क घडला.

वकील क्षेत्रात कार्यरत असलेले अॅड.विवेक पाटील हे नित्यनियमाने धरणगाव येथून अप-डाऊन करीत होते. गुरुवारी सायंकाळी ते जळगावहून आपले कामकाज करून धरणगावकडे दुचाकी (एम.एच.19 सी.एच.1396) ने निघाले होते. मात्र याच दरम्यान, मानराजपार्क जवळ समोरून येणार्या कंटेनर (एम.एच.04 एच.एच.2094) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार अॅड.विवेक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नगरसेवक अमर जैन आणि सागर पाटील यांनी घटनास्थळ गाठत जिल्हा रुग्णालयातून शववाहिका मागवत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
मयत अॅड.पाटील यांच्या पश्चात सहा महिन्यांची मुलगी, पत्नी आणि आई असा परीवार आहे. अपघातामुळे दोन्ही बाजुची वाहतूक पुर्णतःठप्प होवुन जवळपास दोन्ही बाजुने 3-4 किलोमिटर लांबचलाब वाहनांच्या रांगा लागल्या.