महाराष्ट्रराजकारण

..तर मी राजीनामा देण्यास तयार; धनंजय मुंडेंचं दिल्ली दौऱ्यादरम्यान मोठं विधान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । बीडमधील (Beed) मस्साजोग सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येप्रकरणी राज्यभरात खळबळ उडाली असून याप्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झालीय. कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले असून याप्रकरणी विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचदरम्यान धनंजय मुंडे हे दिल्ली दोऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे ते राजीनामा देणार, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.

आज दिल्लीला धनंजय मुंडे यांना प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नैतिकतेतून मी दोषी वाटत नाही, पण जर मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा. मुख्यमंत्र्यांनी तशी मागणी केली तर मी राजीनामा देण्यास तयार आहे,असं विधान दिल्ली दौऱ्यावर असलेले धनंजय मुंडे यांनी केलंय.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फासावर चढवा, असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे म्हणालेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button