जळगाव शहरातील शक्य असतील तितके रस्ते काँक्रीटचे करा : उपमुख्यमंत्री फडणवीस

जून 27, 2023 5:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यासाठी आजच्या आमच्या सरकारने फक्त रस्त्यांसाठी जवळजवळ अडीच हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्वच रस्ते हे चकाचक होणार आहेत. याचबरोबर जळगाव शहरासाठी आम्ही शंभर कोटींचा निधी दिला आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

fadanvis devendra

शासन आमच्या दारी या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव शहरामध्ये आले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री अब्दुल सत्तार व जिल्ह्यातील आमदार व खासदार उपस्थित आहेत.

यावेळी भाषणामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जळगाव शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभर कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून जळगाव शहरातील रस्ते चकाचक खड्डे मुक्त होणार आहेत. मागच्या वेळेस आपणही निधी दिला, मात्र सरकार बदललं. मात्र आता शहरातील रस्ते करण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे

यावेळी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेत लवकरात लवकर कामे मार्गे लावा शहरातील बहुसंख्य रस्ते हे कंपनीचे करा आणि जळगाव शहर खड्डे मुक्त करा असे आवाहन केले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now