सातोडला गावठी दारूची भट्टी नष्ट, संशयिताला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । सातोड शिवारात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी वर पोलिसांनी धडक कारवाई केली. यात दारू व अन्य साहित्य असा १० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

अंतुर्ली मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांचे मार्गदर्शनाखाली सातोड शिवारात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईत ८ हजार रुपये किमतीच्या २०० लिटर मापाचे चार प्लास्टिकचे ड्रम, त्यात सुमारे ८०० लिटर गुळ व मोह मिश्रित कच्चे रसायन, एक हजार किमतीचे दोन ड्रम, त्यात १०० लिटर गुळ मोह मिश्रित पक्के रसायन, तयार गावठी लिटर दारू व अन्य साहित्य असा १० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. या कारवाईत वसंता शिवराम बेलदार (रा.सातोड, ता.मुक्ताईनगर) याला ताब्यात घेण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे, हवालदार गणेश मनुरे, रवींद्र मेढे, अंकुश बाविस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हे देखील वाचा :
- संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर नात्यातील नराधमाचा अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती
- एरंडोलमधील ३ कुख्यात गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून तडीपार
- सालदाराकडून वृद्ध मालकिणीचा बेल्टने गळा आवळून खून ; रावेरातील घटनेने खळबळ
- तरसोद-पाळधी बायपासवर पुन्हा भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू
- मावशीच्या घरावरच भाच्याचा डल्ला! रावेरातील घरफोडीचा छडा; दोघे जेरबंद




