सोमवार, डिसेंबर 11, 2023

..तर खडसेंना काळे झेंडे दाखवण्याची गरज पडली नसती ; जळगावात देवेंद्र फडणवीसांचा टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जळगाव दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, विविध मागण्यावरून राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. त्यावरून उपमख्यमंत्री फडणवीस यांनी खडसे यांच्यावर टोला लगावला आहे. Devendra Fadnavis criticizes Eknath Khadse

एकनाथ खडसे यांना आता नवीन मालक मिळाला आहे नवीन मालिका प्रमाणे ते सध्या काम करत आहेत खरंतर खडसेंनी जमिनीमध्ये जर तोंड काळ केलं नसतं तर त्यांना आज काळे झेंडे दाखवण्याची गरज पडली नसती असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावत येतात लगावला. त्यामुळे फडणवीस यांच्या या टीकेला खडसे काय उत्तर देतात हे पाहन गरजेचं होते.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी आज दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.