बातम्यामहाराष्ट्रराजकारण
अखेर भाजपच्या गटनेत्याची निवड; देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
![devendra fadanvis | Jalgaon Live News](https://jalgaonlive.news/wp-content/uploads/2021/05/devendra-fadanvis-jpg-webp-webp.webp)
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता १२ दिवस झाले तरी देखील राज्यात सरकार स्थापन झाले नाही. उद्या महायुतीचा सरकारचा शपथविधी असून यावेळी कोण मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. त्यापूर्वी भाजपच्या गटनेत्याची निवड करण्यात आली.
मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजप पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आता विधिमंडळ पक्ष बैठकीत संमत होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे.